Toranmal 
महाराष्ट्र

थंडीचा जोर वाढला; तोरणमाळला ११ अंश सेल्सिअस तापमान

थंडीचा जोर वाढला; तोरणमाळला ११ अंश सेल्सिअस तापमान

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या हुडहुडी वाढली असून शहरी भागात तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर थंड हवेचे ठिकाण म्हणून म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ (Toranmal), डाब, मोलगी परिसरात तापमान (Temperature) ११ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. (nandurbar-news-The-cold-intensified-11-degree-Celsius-temperature-in-Toranmal)

मागील दोन दिवसांपासून गारठा वाढला आहे. काहीसे ढगाळ वातावरण राहिल्‍यानंतर थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच्या (Nandurbar) तोरणमाळ, डाब, मोलगी परिसरात हुडहुडणारी थंडीने जनजीवन विस्कळीत होत आहे. तसेच जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये थंडीमुळे रस्त्यावर सकाळी उशीरापर्यंत सामसूम दिसत आहे.

थंडी वाढणार

जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीची लाट येण्याची शक्‍यता कृषी विज्ञान केंद्र हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी गरम कपडे परिधान करावे तसेच केळी, पपई फळबागा प्लास्टिकने गुंडाळावे, गाय, बैल, बकरी आदी जनावरांना उघड्यावर न बांधता बंद घरात गोठ्यात बांधावे, कुक्‍कुट पालन शेतकऱ्यांनी शेडला पडदे लावून १०० डिग्री तापमान लाईटचा वापर करावा, असे आव्हान कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT