Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : सफाई कामगार,चालकाने घेतली १० हजाराची लाच; फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मोबदला

Nandurbar News : सफाई कामगार,चालकाने घेतली १० हजाराची लाच; फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मोबदला

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार (Nandurbar) आगारातील चालकाकडून लाच मागितली. १० हजाराची लाच स्वीकारताना सफाई कामगार व खासगी वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.

नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण रूग्णालयाचा सफाई कामगार जयेश शंकर तेजी याने लिपिक असल्याचे भासवून एका खासगी वाहन चालक तुकाराम भिला भोई याच्या मदतीने बस आगारातील ५५ वर्षीय व्यक्तीकडून १२ हजाराची लाचेची (Bribe) मागणी केली. रनाळे खुर्द (पो.भादवड ता.नंदुरबार) येथील तक्रारदार हे मे २०२३ पासून प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय रजेवर होते. त्यांची प्रकृती आता सुधारल्याने त्यांना नोकरीवर हजर व्हायचे होते. यासाठी जिल्हा रूग्णालयातील फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात (Hospital) कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी गेले होते.  

या दरम्यान जयेश शंकर तेजी याने त्यांच्याशी संपर्क साधला असता मी जिल्हा रूग्णालयात लिपिक असल्याचे सांगितले. तसेच त्याचा साथीदार तुकाराम भोई हा डॉक्टर असल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देतो, त्या बदल्यात १२ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १० हजारांत ठरले. ही रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सफाई कामगार जयेश तेजी व खासगी वाहनचालक तुकाराम भोई या दोघांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT