Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

राष्‍ट्रपतींचा शपथविधी; आदिवासींच्‍या जल्‍लोषात गिरीश महाजनांसह जिल्‍हाधिकारींचा सहभाग

राष्‍ट्रपतींचा शपथविधी; आदिवासींच्‍या जल्‍लोषात गिरीश महाजनांसह जिल्‍हाधिकारींचा सहभाग

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्ग अक्कलकुवा तालुक्यातील गोरजाबारी गावांमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन व नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्या उपस्थितीत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांनी भर पावसात (Rain) आदिवासी ढोल वाजवून नृत्य सादर करत आनंद साजरा केला. (Nandurbar Today News)

द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांनी राष्‍ट्रपती पदाची शपथ घेतल्‍यानंतर आदिवासी बांधवांनी जल्‍लोष केला. यात अक्‍कलकुवा (Akkalkuwa) येथे देखील जल्‍लोष केला.

आदिवासी समाजासाठी महत्‍त्‍वाचा दिवस

भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजासाठी आज महत्त्वाचा दिवस असून एका सामान्य कुटुंबातील आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याने आदिवासी समाजासाठी सन्मानाचा दिवस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राष्ट्रपती शपथविधीचा सोहळा साजरा करण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

SCROLL FOR NEXT