Nandurbar Police Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Police : नंदूरबार पोलीस विभागात खळबळ, पोलीस निरीक्षकासह दोघे सस्पेंड, नेमकं काय प्रकरण?

Nandurbar News : चौकशी करत असताना त्याच्या काही फोन रेकॉर्डींग पोलीस अधिक्षकांना आढळून आले आहे. यामुळे पोलीस अधिक्षकांनी ही तडकाफडकीने निलंबणाची कारवाई

Rajesh Sonwane

नंदुरबार : नंदुरबारच्या उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याबाबत गैरकृत्यात सहभाग असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या. याबाबत संपूर्ण चौकशी करून पोलीस निरीक्षक श्याम निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश भामरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम निकम व पोलीस कर्मचारी गणेश भामरे यांच्यावर तडकाफडकीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षक श्रवणदत्त एस. यांनी सदरची कारवाई केली आहे. उपनगर (Police) पोलीस ठाण्याचे निरीक्षक निकम हे गैरकृत्यामध्ये सहभागी होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. याची चौकशी करत असताना त्याच्या काही फोन रेकॉर्डींग पोलीस अधिक्षकांना आढळून आले आहे. यामुळे पोलीस अधिक्षकांनी ही तडकाफडकीने निलंबणाची कारवाई केल्याचे बोलले जात आहे. 

पोलीस निरीक्षक निकम हे काही आर्थिक व्यवहार करत असताना कर्मचारी गणेश भामरे यांचा देखील यात सह्भाग (Nandurbar Police) असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे निकम यांच्यासह भामरे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असून कुठल्याही प्रकारे गैरकारभारावर पांघरून घातल्या जाणार नसल्याचे संकेत या कारवाईतून पोलीस अधिक्षकांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT