एसटी  
महाराष्ट्र

नंदुरबार : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदने प्रवाशांचे हाल; खासगी वाहतुकीत आर्थिक लुट

एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदने प्रवाशांचे हाल; खासगी वाहतुकीत आर्थिक लुट

नंदुरबार दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर, शहादा, अक्कलकुवा आगारात मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशी वाहतूक सेवा बंद होती. मात्र नंदुरबार आगारातून सकाळी अंशतः एसटी प्रवासी वाहतूक सुरू होती. दुपारी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. सकाळी गावावरून शहरात आलेल्या नागरिकांना पुन्हा घरी जायला असुविधा निर्माण झाली आहे. (Nandurbar-news-ST-workers strike-condition-of-passengers)

प्रवाशांची होतेय लुट

सरकारी बस बंद असल्याने खाजगी प्रवाशी वाहतुक दारांकडून अव्‍वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशाची लूट सुरू आहे. परंतु, गावी जाण्यासाठी बाहेर पडल्‍यामुळे प्रवाशांचा नाईलाज होत आहे. जास्‍तीचे भाडे देवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर सोडवून गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शहाद्यातही बंद

महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करावे, शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारातही एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अक्कलकुवा, नवापूर आगारातील कर्मचाऱ्यांचेही आंदोलन सुरु आहे. राज्य शासनाने आतातरी आमच्या मागण्या मान्य कराव्या. एसटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी शहादा आगारातील आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT