महाराष्ट्र

नंदुरबार वगळता अन्य आगारातील बससेवा बंद

नंदुरबार वगळता अन्य आगारातील बससेवा बंद

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नवापूर आगारातील एसटी प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद आहे. मात्र नंदुरबार आगारातून जिल्हा अंतर्गत सेवा सुरू आहे. (nandurbar-news-st-employee-strike-and-bus-service-stop)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपली प्रमुख मागणी एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनात विलगीकरण करावे, यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाजेष्ठता निश्चित करून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही; तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे नवापूर आगाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी नवापूर एसटी आगारचा प्रवेशव्दाराजवळ नवापूर एसटी कर्मचारी विजय गावीत, रवि गावीत, भिमसिंग गावीत, सुरेश अहिरे, विलास गावीत, जे. डी. गावीत, आर. एस. खराटे, सुजाता मोरे, राजश्री घरटे, अल्का पवार, मिरा सपकाळ यांच्यासह असंख्य चालक वाहक यांञीक कर्मचारी बेमुद संपावर बसले आहेत.

सकाळपासून एकही फेरी नाही

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नवापूर आगारातील एसटी सेवा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पूर्णपणे बंद आहे. एकमेव नंदुरबार आगारातून जिल्हा अंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे, पहाटेपासून शहादा, अक्कलकुवा, नवापूर या आगारामधून एकही बस बाहेरगावी रवाना झालेले नाही. नवापूर, शहादा, अक्कलकुवा बस आगारात सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT