Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News: एकाच रात्री सहा घरफोड्या; दागिन्‍यांसह रोख रक्कम लंपास

एकाच रात्री सहा घरफोड्या; दागिन्‍यांसह रोख रक्कम लंपास

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहराच्या वेगवेगळ्या भागात सोसायटीतील सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम (Crime News) लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे नवापूर (Navapur) शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra News)

गेल्या अनेक दिवसांपासून नवापूर शहरात घरफोडीचे सत्र थांबले होते. परंतु अचानक रात्री झालेल्या सहा घरफोड्यांनी पोलिसांच्या (Police) कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घरातून चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने रोख रक्कम असा सामान लंपास केल्याची घटना घडली आहे. या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाण्यामध्ये घरमालकांनी तक्रार दिली असून नवापूर पोलीस त्याच्या शोध घेत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी भेट देऊन पाहणी केली.

नवापूर शहरातील जनता पार्क, मंगलदास पार्क, मांदा सोसायटी आदी परिसरामध्ये बंद घरांना टार्गेट करीत एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली आहे. तीन चोरटे मोटरसायकलीने आले अन्‌ चोरी करून गेले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे.

नवापूर शहरात पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नवापूर शहरात एकाच रात्री सहा घरफोड्या भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. ज्या भागात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे वास्तव आहे. तेथेच घरफोड्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एस. बी. साळुंके यांच्या घरात पोलीस उपनिरीक्षक यांचे वास्तव असताना खाली चोरट्यांनी घरफोड्या केल्याने चोरट्यांनी पोलीसांना मोठे आव्हान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 व्या वेतन आयोगामुळे HRA मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता; कसे असेल कॅल्क्युलेशन?

Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच फूट पडली का? सुनील तटकरेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण

Mumbai : विरारमध्ये भयंकर घडलं, अर्नाळा समुद्रात ४ मुलं वाहून गेली

Skin Care Tips: काही क्षणांत मिळवा नितळ त्वचा! घरच्या घरी असे तयार करा अॅलोवेरा कोलेजन जेल

Parenting Tips : मुलांना ट्यूशनला पाठवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, नाहीतर बिघडेल मुलांचे भविष्य

SCROLL FOR NEXT