Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News: खोदकाम करताना सापडले शिवलिंग, प्राचीन चबुतरा; मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

खोदकाम करताना सापडले शिवलिंग, प्राचीन चबुतरा; मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात पुरातन मंदिर, मुर्ती आणि प्राचीन वस्तू सापडणे; हे काही नवीन नाही. यातच जिल्ह्यातील शहादा (Shahada) शहरातील कुकडेल भागात शनि मंदिराच्या मागच्या बाजूला पुरातन भावसार समाज मढीचा जागेवर खोदकाम करताना समाधी वजा शिवलिंग, चबुतरा आणि पादुका आढळून आले आहे. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Maharashtra News)

शहाद्यातील कुकडेल हा परिसर प्राचिन ऐतिहासिक व धार्मिक भाग समजला जातो. प्रकाशा येथे देखील टेकडीवर खोदकाम करताना मूर्ती सापडली होती. याचसोबत शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर पाडळदा गावात जुने घराचे बांधकाम करीत असताना त्या ठिकाणी पुरातन तोफा आढळून आल्या आहेत. यामुळे शहादा परिसरात ऐतिहासिक धार्मिक याबाबतच्या अनेक गोष्टींना इथे उजाळा मिळत आहे.

भाविक करत आहेत गर्दी

शहरातील कुकडेल परिसरातील शनि मंदिराच्या मागे खोदकाम करीत असताना मंदिराचा चबुतरा, शिवलिंग, समाधी आढळून आलेली आहे. ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरतात शहर व परिसरातील भाविक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT