Robbery 
महाराष्ट्र

शहाद्यातून शंभर दुधाचे कॅन चोरी; पथकाने केली अटक

शहाद्यातून शंभर दुधाचे कॅन चोरी; पथकाने केली अटक

दिनू गावित

नंदुरबार : शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघ या कार्यालयाच्या मागील बाजुस असलेले लोखंडी शटर तोडून दूध संकलनासाठीचे स्टीलचे कॅन १ लाख रुपये किमंतीचे शंभर कॅन चोरट्यानी चोरून नेले होते. कॅन चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक केली. (nandurbar-news-shahada-police-arrested-milk-can-robbery-parson)

कॅन चोरीप्रकरणी दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाचे मॅनेजर उद्धव पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा शेतकरी संदर्भात असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे देत घटनेचा उलगडा लावून गुन्हेगारांना शोधून चोरीस गेलेला मुद्देमाल मिळविण्याबाबत आदेश दिले.

चक्र फिरवून लावला छळा

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत बातमीदारांना सक्रीय केले. दुध उत्पादक संघ येथे झालेली चोरी मलोणी येथील विशाल ठाकरे नामक युवकाने ५ ते ६ साथीदारांच्या मदतीने केली असुन तो सध्‍या मलोणी परीसरातच फिरत असल्‍याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथकाने मलोणी येथे जाऊन विशाल ठाकरे याला ताब्यात घेतले. त्यास दुध उत्पादक संघ येथे झालेल्या चोरीबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारसह केल्याचे कबुल केले. याप्रकरणी लहान शहादा येथील अविनाश काशिनाथ सामुद्रे, राजेश ब्रिजलाल भिल, मलोणी येथील रविंद्र भगवान भामरे यांचेसह चोरी केल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणी विशाल आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दुधाचे सर्व कॅन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Pimpari Chichwad : महापालिका रूग्णालयात रंगली कर्मचाऱ्यांची दारू पार्टी, पिंपरी-चिंचवडमधील VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक, रूपाली चाकणकरांच्या कार्यालयावर आज मोर्चा

SCSS: निवृत्तीनंतर दर महिन्याला २०,००० मिळवायचेत? या सरकारी योजनेत आजच गुंतवणूक करा

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्याकडून कर्जमाफीची घोषणा, थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT