गांजा  
महाराष्ट्र

कपाशीच्‍या शेतात गांजा लागवड; १२ लाखांची झाडे जप्त

कपाशीच्‍या शेतात गांजा लागवड; १२ लाखांची झाडे जप्त

संजय महाजन

शहादा (नंदुरबार) : मलगाव (ता. शहादा) येथे कपाशीच्या शेतात बेकायदेशीररित्या लागवड केलेल्या झाडांच्‍या शेतीवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात सुमारे ११ लाख ९० हजार किंमतीचे १७० किलो वजनाची २५० गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे. दरम्यान पोलिसांनी अशा घटनांमधील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची गरज आहे. (nandurbar-news-shahada-Cannabis-cultivation-in-cotton-fields-12-lakh-trees-seized)

शहादा तालुक्यातील मलगाव शिवारात अजय सुभाष पटले यांच्या शेतात धाड टाकली असता तेथे कपाशीच्या शेतात गांजाची झाडांची लागवड केल्याचे मिळून आले. कारवाई दरम्‍यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गांजाची शेती करणे बेकायदेशीर असतानाही अजय पटले यांनी त्यांच्या शेतात गांजा शेतीची लागवड केली होती. पोलिसांनी एकूण १७० किलो वजनाची २५० लहान- मोठी गांजाची झाडे जप्त केली. त्यांची किंमत सुमारे ११ लाख ९० हजार आहे. शेतमालक अजय सुभाष पटले यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार मेहरसिंग वळवी, दिनकर चव्हाण, जयेश बाविस्कर, किरण जिरेमाळी, दीपक परदेशी, अनमोल राठोड, अमृत पाटील, दिनेश लाडकर, संजय राम मुळे यांच्या पथकाने केली.

आठवड्यातील दुसरी कारवाई

दरम्यान याच आठवड्यात घोटाळी येथे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजाच्‍या शेतीवर मोठी कारवाई केली होती. त्यात देखील लाखो रुपये किंमतीचा गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. आठवड्याभरात ही दुसरी कारवाई असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. तर ८–९ महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिरुड येथे लाखो रुपये किमतीची अफुची झाडांची शेतीवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे शहादा तालुक्यात विशेषतः आदिवासीबहुल क्षेत्रातील शेती शिवारात मोठ्या प्रमाणात अफू व गांजाची शेती केली जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

SCROLL FOR NEXT