malnourished children 
महाराष्ट्र

नंदुरबार पॅटर्न राज्यात राबवणार; कुपोषित बालकांची शोध मोहिम

नंदुरबार पॅटर्न राज्यात राबवणार; कुपोषित बालकांची शोध मोहिम

दिनू गावित

नंदुरबार : सातपुडा अतिदुर्गम परिसर असलेल्‍या नंदुरबार जिल्‍हा हा आदीवासी जिल्‍हा म्‍हणून ओळखला जातो. मात्र हा जिल्‍हा आता कुपोषित बालकांच्‍या प्रमाणात देखील अव्‍वल झाला आहे. लॉकडाउननंतर झालेल्‍या सर्वेक्षणात कुपोषित बालकांच्‍या संख्‍येवरून हा आकडा समोर आला असून, या बालकांसाठी शोध मोहिम राबविली गेली. आता मात्र नंदुरबारचा हा पॅटर्न राज्‍यभरात राबविला जाणार आहे. (nandurbar-news-Search-for-malnourished-children-Nandurbar-pattern-to-be-implemented-in-the-state)

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यांमध्ये दरवर्षी कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शोधमोहीम सुरु केली जाते. प्रामुख्याने सातपुडा दुर्गम भागातील आदिवासी बांधव उन्हाळ्यात रोजगारासाठी परराज्यात गेलेले असतात होळीनिमित्त व पावसाळ्यापूर्वी गावी परततांना प्रशासनाकडून कुपोषित बालकांची शोध मोहीम सुरू केली जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे या भागातील नागरिक रोजगारासाठी बाहेर पडले नसल्यामुळे शोध मोहिमेअंतर्गत कुपोषित बालकांची संख्या राज्यात अव्वल ठरली आहे.

तीन हजाराहून अधिक बालके कुपोषित

जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाद्वारे केलेल्या शोध मोहिमेअंतर्गत पावसाळ्यापूर्वी झालेल्या स्क्रीनिंगमध्ये तब्बल तीन हजार २१३ अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे.

साडेतिनशे टीम

शोध मोहिमेअंतर्गत ३५० टीम करण्यात आल्या होत्या. त्यात जवळपास दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वेक्षणात यंत्रणा प्रत्येक बालकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून तीव्र व अतीतीव्र कुपोषित बालके आढळल्यास पोषण आहार केंद्रांमध्ये भरती करून तत्काळ उपचार सुरू केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान पोषण आहार पुरवठा योजनाही विस्कळीत झाली. तसेच उपचारासाठी केंद्रांमध्ये पालक येत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT