राजू शेट्टी 
महाराष्ट्र

२८ ऑक्‍टोंबरला राजू शेट्टी नंदुरबार जिल्‍ह्यात; प्रकाशा येथे ऊस परिषद

२८ ऑक्‍टोंबरला राजू शेट्टी नंदुरबार जिल्‍ह्यात; प्रकाशा येथे ऊस परिषद

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे येत्‍या गुरूवारी (२८ ऑक्‍टोंबर) नंदुरबार जिल्‍ह्यात येत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रकाशा येथे शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेण्यात येणार आहे. (nandurbar-news-Raju-Shetty-in-Nandurbar-district-on-28th-October-Sugarcane-conference-at-Prakasha)

नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्रलंबित असून आद्यपपर्यंत सुटलेले नाहीत. त्याचप्रमाणे पपई व केळी उत्पादकांचे देखील प्रश्न प्रलंबित आहेत. ऊस, केळी व पपई उत्पादकांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघटना लढा देत आहे. त्यानुसार समाधानकारक भाव मिळत होता.

पपई उत्‍पादकांचीही लुट

सध्या गेल्या दोन वर्षांपासून पपई उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. समाधानकारक भाव मिळत नाही. महावितरणकडून देखील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यामुळे विविध प्रश्न सोडविण्यासाठी २८ ऑक्‍टोंबरला राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT