Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपकडून निदर्शने; पाठिंबा न देण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपकडून निदर्शने; पाठिंबा न देण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्‍या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांकडून (Nandurbar) नंदुरबारमध्‍ये निदर्शने करण्यात आली. तसेच भाजपने (BJP) पाठींबा देण्यासंदर्भात आदेश दिले तरी पाठींबा देणार नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण यावेळी केले. (Breaking Marathi News)

नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला महागाई विरोधाच्या आंदोलनात काळे फसले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नागरिकाचा सन्मान करता येत नाही. त्याला भाजपने पाठिंबा देऊ नये आणि पक्षाने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते अशा उमेदवाराला मतदान करणार नाहीत; असा इशारा नंदुरबार मधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरसेविका पुत्र लक्ष्मण माळी यांनी दिला आहे.

जोरदार घोषणाबाजी

लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण मतदारांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात निदर्शने केले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्या हातात सत्यजित तांबे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासत असलेले बॅनर होते. एकूणच पदवीधर मतदार संघाच्या प्रचार संपायला दोन दिवसाचा अवधी उरला असला तरी भाजप आतून सत्यजित तांब्यांना होणारा विरोध तीव्र झाला असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT