BJP 
महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा निषेध; मंदिरे उघडण्यासाठी नंदुरबारमध्‍ये शंखनाद, घंटानाद

ठाकरे सरकारचा निषेध; मंदिरे उघडण्यासाठी नंदुरबारमध्‍ये शंखनाद, घंटानाद

दिनू गावित

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मंदिर खुली नाही. यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्‍हाभरात मंदिराबाहेर शंखनाद, घंटानाद आंदोलन केले. मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले. (nandurbar-news-Protest-of-Thackeray-government-Shankhanad-bell-ringing-in-Nandurbar-to-open-temples)

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात उद्धव सरकारने मंदिरे बंद करून बार सुरू केले आहे; याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे नंदुरबार व शहादा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाही महाविकास आघाडी सरकारने सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे क्लब चालु असतांना मात्र भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मंदिरे मात्र बंद आहे. देवस्थान मंदिरे बंद असल्या कारणाने भाविकांना आपल्या श्रध्देय परमेश्वराकडे नमन वंदन करायला देखील या सरकारने बंदी घातली आहे.

हिंदु मानाचा अनादर

मंदिराच्या आधारीत व्यवसायिकांना देखील उपासमारीची वेळ आली आहे. फुल विक्रेता, नारळ विक्रेता, पुजेचे साहित्य विक्रेता यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याची काळजी या सरकारला नाही. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणुन घेणाऱ्या ठाकरे सरकारने मात्र हिंदु मानाचा अनादर केला आहे.

उद्धव सरकार में शराब का बोलबाला...

हिंदु समाजाची चेष्ठा असून भाजपतर्फे याचा मंदिराबाहेर शंखनाद, घंटानाद आंदोलन करुन मंदिरे उघडण्याबाबत ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा भाग म्हणुन मंदिर बंद गरिबांचे हाल, मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, भक्तों को जेल मंदिरों पे ताला, उद्धव सरकार में शराब का बोलबाला असे घोषवाक्याचे फलक दाखवुन निषेध आंदोलन करण्यात आले. मंदिरे उघडण्यासाठी महाविकस आघाडी सरकारने तत्काळ परवानगी द्यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT