Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: माल वाहतूक रेल्वेच्या धडकेत एक ठार

माल वाहतूक रेल्वेच्या धडकेत एक ठार

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वे (Railway) गाडीने धडक दिली. यात पन्‍नास वर्षीय इसमाचा मृत्‍यू झाला. (Nandurbar News Accident Death)

खांडबारा बर्डीपाडा येथील प्रल्हाद अर्जुन गोसावी (वय 50) व्यक्ती (Nandurbar News) खांडबारा रेल्वे स्टेशनपासुन काही अंतरावर बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार करून येत असताना खांडबारा गावात रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरून भरदा वहिनी येणाऱ्या मालवाहतूक रेल्वे गाडीने (Accident) धडक दिल्याने गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कटलरी विक्री करून उदरनिर्वाह

प्रल्हाद गोसावी हे अत्यंत गरीब कुटुंबाचे असुन गावोगावी फिरुन कटलरी वस्तू विक्री करून उदरनिर्वाह करत होते. घटनास्थळी नंदुरबार रेल्वे पोलीस दाखल झाले असुन त्यांनी पंचनामा करून मयतचे शव खांडबारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. अत्यंत गरीब परिवाराचे प्रल्हाद गोसावी यांचे अपघाती निधन झाल्याने बर्डीपाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT