Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

मोफतचे धान्य नको..युवकाचे तहसीलदारांना निवेदन

मोफतचे धान्य नको..युवकाचे तहसीलदारांना निवेदन

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील युवक राजू सोमा शिंदे यांनी मला मोफतचे रेशन नको; असे निवेदन शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना देऊन प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचा माझा पुरवठा थांबवावा अशी मागणी केली आहे. (nandurbar news No need for free food Young man statement to tehsildar)

खेडदीगर येथील राजू शिंदे यांनी दिलेल्‍या निवेदनात असे म्हटले आहे, की प्रधानमंत्री यांनी गरीब जनतेसाठी कोरोनाच्या (Corona) काळात प्रधानमंत्री जनकल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य वितरण सुरू केले. ते आजपर्यंत सुरू आहे. याचा लाभ मी ही घेतला आहे. परंतु आता मी काम, कष्ट करून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो. या मोफतच्या (Nandurbar News) धान्याने मिळतेय म्हणून माझ्यातील आळस जागी होतोय. म्हणून मला या पुढे प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे मोफतचे धान्य नको.

शासन दराप्रमाणे खरेदीची तयारी

शासनाच्या रेशन दुकानामार्फत विकत वितरित करण्यात येणारे धान्य शासन दराप्रमाणे खरेदी करून घेईल. माझ्या या मोफतचे धान्य सोडल्याने कुणा गरीबास ते मिळु शकेल. एक सुजाण नागरिक म्हणून मोफत धान्य घेणे हे काही योग्य वाटत नाही. तरी माझ्या गरीब कल्याण योजनेचा कोटा थांबवावा अशा आशयाचे निवेदन शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी याना देऊन मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT