Theft 
महाराष्ट्र

शाळेतील डिजीटल साहित्‍याची चोरी

शाळेतील डिजीटल साहित्‍याची चोरी

दिनू गावित

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बोरवण जिल्हा परिषद डिजिटल शाळेत चोरी झाल्‍याच प्रकार उघड झाला आहे. प्राथमिक शाळा बंद असल्याने शाळांमधील डिजिटल साहित्याच्‍या चोरीचे सत्र सुरूच असल्‍याचे यावरून दिसून येत आहे. (nandurbar-news-navapur-taluka-Theft-of-digital-school-materials)

जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा अद्यापही सुरू झालेल्‍या नाही. यामुळे या बंद शाळांमधील डिजिटल क्लासरूमच्या साहित्य चोरीच्या घटनेत वाढ झाली. नवापुर तालुक्यातील आमलान शाळेनंतर आता बोरवण जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लास रूममधील दरवाजाचे कुलूप तोडून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेले आहे.

६५ हजाराचे साहित्‍य चोरी

शाळेतील ३२ इंची एलईडी टीव्ही, इन्‍व्‍हर्टर बॅटरी, मिराकास्ट डोंगल असे एकूण ६० ते ६५ हजाराची चोरी झाल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद बोरवण शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरूण कोटवाल, उपसरपंच दिनेश गावित, पोलीस पाटील विपिन गावीत, ग्रामपंचायत सदस्य मिना गावित, चंद्रवती गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आमलाण शाळेत चोरी झाली होती त्यानंतर बोरवण जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याने चोरटे बंद शाळांना टार्गेट करीत महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करीत असल्याचे दिसून येत आहे.

लोकवर्गणीतून साहित्‍य

लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्यासाठी दिलीप गावित व यशोदा यशोदा वसावे यांनी मोठे परिश्रम घेतले होते. शाळेतील साहित्य चोरीला गेल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात नवापूर पोलिसांनी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयी

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT