Nandurbar Palika Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Palika : मालमत्ता कर न भरल्याने ३५ हून अधिक दुकानांना सील; नंदुरबार पालिकेची कर वसुली मोहीम

Nandurbar News : मार्च एंडिंगच्या अनुषंगाने महापालिका व नागरपालकीकेकडून जोरदार वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करत मालमत्ता कराची वसुली जोरात करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम राबवली जात आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांकडून वसूल करण्यात येत असून कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या वसुली मोहिमेत नगरपालिकेकडून आतापर्यंत कर न भरणाऱ्या ३५ दुकानांना सील लावण्यात आले आहे. यात सर्वात मोठी कारवाई हि नाट्यगृहाला लावण्यात आलेल्या सीलची झाली आहे. 

मार्च एंडिंगच्या अनुषंगाने महापालिका व नागरपालकीकेकडून जोरदार वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करत मालमत्ता कराची वसुली जोरात करण्यात आली आहे. त्यानुसारच नंदुरबार नगरपालिकेकडून देखील वसुली मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाला देखील सील लावण्यात आले आहे. 

पंधरा दिवसांपासून कारवाई सुरु 

गेल्या पंधरा दिवसात नंदुरबार शहरातील एकूण ३५ पेक्षा अधिक दुकाने पालिकेचे सिल केल आहे. अर्थात नगरपालिकेकडून मालमत्ता कर न भरणाऱ्यांना नोटीस दिली जात आहे. नोटीस देऊन देखील मालमत्ता कर न भरल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. आता देखील नोटीस बजावल्यानंतर कर न भरणारी सर्व दुकाने सिल करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पवन दत्ता यांनी दिले आहेत.

नाट्यगृहाला सील 

नगरपालिकेची मालमत्ता कर न भरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाला देखील सहा दिवसापासून सील करण्यात आले आहे. दरम्यान नाट्यगृहात कार्यक्रम घेण्यासाठी काही जणांनी आगाऊ बुकिंग करून ठेवलेले होते. मात्र नाट्यगृहाला सील लागल्याने आता नाट्य मंदिरात आयोजित सर्व कार्यक्रम आता रद्द करण्यात आल्याने आयोजकांचे चांगलेच हाल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: उबाठाचे ६ बंडखोर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शिंदेसेनेत करणार प्रवेश; पाहा VIDEO

Maharashtra News Live Update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मान्सून दाखल

स्वातंत्र्याच्या ८८ वर्षांनंतरही आदिवासी पाड्यांचा संघर्ष सुरूच; केडीएमसीवर धरणे आंदोलन

Monsoon Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाची मोठी अपडेट

नवी मुंबई हादरली! दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना ढकलले वेश्याव्यवसायात; शिंदेसेना आणि भाजप नेत्याला बेड्या

SCROLL FOR NEXT