भारती पवार 
महाराष्ट्र

कुपोषण निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढणार : डॉ. भारती पवार

कुपोषण निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढणार : डॉ. भारती पवार

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्यावतीने स्वतः आरोग्य राज्यमंत्री या नात्याने विशेष लक्ष घालणार. गरोदर मातांचे समुपदेशन करून येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कुपोषण निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढणार असल्‍याचे आश्‍वासन केंद्रीय आरोग्य व महिला बालकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले. (nandurbar-news-mp-bharati-pawar-press-and-The-problem-of-malnutrition-will-be-solved)

डॉ. भारती पवार या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर असून जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविड विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. डॉ. पवार यांनी रुग्णालयातील नवजात अर्भक उपचार कक्ष आणि कुपोषण पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.

कुपोषणाच्‍या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष

केंद्र शासनाने विविध आरोग्यदायी योजनांच्या माध्यमाने महाराष्ट्रासह नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यातील कुपोषणासारख्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घातले आहे. जिल्ह्यात माता व बालकांची मान्सूनपूर्व आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग) केली जात आहे. परिणामी कुपोषित बालके शोधणे सोपे झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सॅम श्रेणीतील बालकांची संख्या ३ हजार ४३९ असून मॅम श्रेणीतील १८ हजार ६५८ एवढी आहे. केंद्राच्या विविध योजना, पोषण आहारच्या माध्यमाने कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्‍याची अशी माहिती केंद्रीय आरोग्य व महिला बालकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत दिली.

तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तत्‍पर रहा

जिल्हा रुग्णालयात त्यांनी कोविड नियंत्रण आणि कुपोषणाबाबत प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यांनी नंदुरबार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्या म्हणाल्या, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवावी. लसीकरण करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोविड चाचण्या सुरू ठेऊन बाधित व्यक्ती आढळल्यास त्याला अलगिकरणात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

राज्‍यांनी माहिती पुरविणे अपेक्षित

केंद्र सरकाराने महाराष्ट्राला सर्वात जास्त लसींचा पुरवठा केला आहे. राज्य सरकारने केंद्राला दोष देण्याऐवजी योग्य नियोजन करून लसीकरण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे पाच लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. गरोदर मातांचे समुपदेशन करून येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कुपोषण निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्रातर्फे सर्व राज्यातील आरोग्य सुविधांवर प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्यावतीने मी स्वतः आरोग्य राज्यमंत्री या नात्याने विशेष लक्ष घालणार असून राज्यांनी याबाबत वेळोवेळी माहिती पुरविणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही असा आरोप पवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT