sarangkheda festival 
महाराष्ट्र

सारंगखेडा घोडेबाजारात सहाशेहून अधिक घोडे दाखल

सारंगखेडा घोडेबाजारात सहाशेहून अधिक घोडे दाखल

साम टिव्ही ब्युरो

सारंगखेडा (नंदुरबार) : सारंगखेडा (ता. शहादा) येथील सुमारे चारशे वर्षे जुना असलेला सारंगखेडा यात्रोत्‍सवाला (Sarangkheda Festival) दोन वर्षांपासून खंड पडला होता. शासनाने दत्त दर्शनासाठी त्याचबरोबर घोडे बाजारासाठी सर्व नियम पाळत परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सारंगखेडा यात्रोत्‍सव समिती आयोजक दत्त मंदिर ट्रस्ट सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करणार आहेत. (nandurbar-news-More-than-600-horses-entered-Sarangkheda-festival)

या वर्षी घोडेबाजार असल्याने अश्वप्रेमी खरेदीदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य दिसत आहे. मात्र प्रशासनाने इतर खेळणी साहित्य, मनोरंजनाचे, शेती साहित्य, मसाले पदार्थ दुकान, कटलरी, शीतपेये दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने आदी सर्व स्टॉल यांना परवानगी दिलेली नाही यामुळे या विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.

दत्ताची १८ डिसेंबरला पालखी

१८ डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे दत्ताचा पालखी सोहळा व आरती होणार आहे. या सोहळ्यासाठी महानुभाव पंथीय अनुयायी ग्रामस्थ व भाविक यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असतो. सायंकाळी दत्त मंदिरात आरती होऊन दत्ताला गाभाऱ्यातून पालखीत घेऊन मंदिरापासून सारंगखेडा मुख्य बाजारपेठ पोलिस (Police) ठाण्यामार्गे टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक निघत पालखी सोहळा पुन्हा मंदिरावर संपतो व दत्ताची गाभाऱ्यात पुन्हा विधिवत स्थापना केली जाते.

घोडेबाजारात उमदे अश्व दाखल

सारंगखेडा येथील घोडेबाजारात सहाशेहून अधिक उमदे घोडे दाखल झाले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. यात मारवाड, काठियावाडी, पंजाबी घोडे म्हणून अश्व बाजाराची विशेष ओळख आहे. पंजाब घोड्याला विशेष मागणी असते. आजअखेर घोडेबाजारात सहाशेहून अधिक घोड्यांची आवक झाली आहे. ही आवक पुढे अजून वाढण्याची शक्यता सचिव चौधरी यांनी व्यक्ती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT