Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस; दुर्गम भागात नदी-नाल्यांना पूर

वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस; दुर्गम भागात नदी-नाल्यांना पूर

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून शहादा, तळोदा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा, तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी दिल्याने शेतकरी सुखावले आहेत. मुसळधार (Nandurbar) पावसामुळे धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे व झाडांचे नुकसान झाले आहे. शहादा (Shahada) शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. (nandurbar news moderate rain with gusts of wind Floods of rivers and streams)

धडगाव तालुक्यातील सोनबुद्रुक, सोन खुर्द, खडक्या, भानोली आणि छापरी गावाला वादळी वाऱ्याचा फटका बसला असुन गावात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गावातील झाडे, अनेक घराची कौल आणि घरे पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर घराजवळ लावलेल्या ओजाऱ्या पावरा यांच्या ट्रॅक्टरवर व काळुसिंग पावरा यांच्या बोलेरो वाहनावर घराची लाकडे आणि कौल पडून वाहनांचे नुकसान झाले गावात मोठ-मोठी आंब्याची झाडे, फांद्या, महुची झाडे उन्मळून पडली आहे. छापरी गावांतील आबला पावरा यांचे पूर्ण घर पडून संसार उघड्यावर पडला आहे. प्रशासकीय पातळीवरून या सर्व नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी गावकरी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

SCROLL FOR NEXT