Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : परिवारातच कोट्यावधीचा निधी; आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Nandurbar News : परिवारातच निधी; आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: पंतप्रधान किसान संपदा योजनेचा १० कोटींचा निधी कन्या सुप्रिया गावित यांचा फार्मकडे वळवला (Nandurbar) असून रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटी रुपयांची सबसिडी मिळाली आहे. यामुळे आता मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्या अडचणीत वाढ होणार असून भाजपमध्ये पण परिवार वाद असली असल्याचं चित्र आता समोर येत आहे. (Maharashtra News)

भाजप नेहमी काँग्रेसच्या परिवार वादावरून टीका करत असते. मात्र भाजपमध्ये सुद्धा परिवार वाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या दोन कन्या असून डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार, तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आहेत. या परिवार वादावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने एपीसी योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पा अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. परंतु यामध्ये चक्क राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. सुप्रिया गावित यांची तापी औद्योगिक विकास कंपनीला देखील लाभ मिळाला आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील तुषार रंधे यांच्या मधुर फूड पार्क या संस्थेच्या २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या फूड प्रोसेसिंग उद्योगाला दहा कोटीचे अनुदान सरकारने मंजूर केले आहे. तुषार रंधे हे विजयकुमार गावित यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्ष यावर टीका करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT