Nandurbar Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Rain Alert : नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Nandurbar News : हवामान विभागाकडून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसानंतर आज पुन्हा हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

हवामान विभागाकडून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसानंतर आज पुन्हा हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काढणीसाठी तयार असलेल्या सोयाबीन, मिरची, कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.  

तीन दिवस पावसाची शक्यता 

काल झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात अजून तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT