Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : ग्रामसभेत सरपंचाच्या नातेवाईकांनी सदस्याला लगावली कानशिलात; नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी ग्रामपंचायतमधील प्रकार

Nandurbar news : ग्रामसभा म्हटली म्हणजे कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून सभेत वाद होत असतो. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी या ग्रामपंचायतीची ग्रामसभा बोलाविण्यात आली होती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मांडवी ग्रामपंचायतीची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. यात सरपंचाच्या जेठाने ग्रामपंचायत सदस्य वालसिंग राहसे यांना कानशिलात लगावली. यामुळे वाद अधिकच वाढला होता. दरम्यान अन्य सदस्यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. 

ग्रामसभा (Gram Sabha) म्हटली म्हणजे कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून सभेत वाद होत असतो. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी या ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. सभेत सदस्यांनी विषय मांडत ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचे परिवार मनमानी पद्धतीने काम करत असून ग्रामसभेच्या संदर्भात विरोधात असलेल्या सदस्यांना कुठल्याही प्रकारे पूर्वकल्पना न देता परस्पर आपल्या घरी ग्रामसभा का घेतात; अशी विचारणा केली. या वरून वादाला सुरवात झाली. 

सदस्याने विचारले असता सरपंच मिनाबाई रासे यांच्या जेठाने ग्रामपंचायत सदस्याला मारले. अनेकदा ग्रामसभा किंवा विकास काम करत असताना सदस्यांना कधीही विश्वासात घेत नाही. वारंवार ग्रामसेवकाकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामसेवक दुर्लक्ष करत असतात. ग्रामपंचायतमध्ये देवाण- घेवाण आणि मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप देखील सदस्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT