Akkalkuwa Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा विधानसभेसाठी पेच कायम; महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रमुख लढत पाहण्यास मिळत असली तरी बंडखोरीमुळे काट्याची टक्कर होणार असल्याचे पाहण्यास मिळणार आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यातील अनेक मतदार संघात उमेदवारी निश्चित होऊन उमेदवारांनी अर्ज भरत प्रचाराला देखील सुरवात केली आहे. तर काही मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही. यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) अशीच प्रमुख लढत पाहण्यास मिळत असली तरी बंडखोरीमुळे काट्याची टक्कर होणार असल्याचे पाहण्यास मिळणार आहे. मात्र काही मतदारसंघात अद्याप उमेदवारीचा तिढा सुटलेला पाहण्यास मिळत आहे. यात (Akkalkuwa) अक्कलकुवा- अक्राणी या मतदारसंघात महायुतीचा तिढा कायम आहे. उमेदवार ठरत नसल्याने महायुतीतील तिन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे.  

जागा शिवसेनेला 

अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघाची हि जागा शिवसेना शिंदे गटाला सुटलेली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवर तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके हे या जागेसाठी इच्छुक असून त्यांच्या वतीनं विधानसभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र उमेदवारी जाहीर होत नसल्याने संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT