Mahavikas Aaghadi 
महाराष्ट्र

शिवसेना, राष्‍ट्रवादीवर कॉंग्रेसची नाराजी

शिवसेना, राष्‍ट्रवादीवर कॉंग्रेसची नाराजी

दिनू गावित

नंदुरबार : महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीने जिल्ह्यात बंदसाठी पुढाकार न घेतल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. (nandurbar-news-maharashtra-bandh-Congress-displeased-with-Shiv-Sena-NCP)

उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्येच्या घटनेच्‍या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पूर्णता पाठिंबा न दिल्याने काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, नवापूर, तळोदा, शहादा या तालुक्यांमध्ये काँग्रेसने पुढाकार घेऊन बंद यशस्वी घडवून आणला.

शिवसेनेचे वर्चस्‍व तरीही..

नंदुरबार शहरात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने पुढाकार न घेतल्याने नंदुरबार शहरातील बाजारपेठा अंशतः खुल्या दिसून आल्या. तर दुर्गम भागातील धडगाव येथे आठवडी बाजार असल्यामुळे खेड्या पाड्यावरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये; यासाठी सकाळी दहा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाल्यानंतर दुपारून बाजारपेठा सुरू ठेवल्या आहेत. नवापूर, तळोदा, शहादा व नंदुरबार येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रशासनाला निवेदन देऊन उत्तर प्रदेश येथील शेतकरी हत्येच्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Aadhaar Card Update : आधार कार्डवर नाव किंवा आडनाव बदलायचे आहे? UIDAI ची ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Sleep Problems: रात्री गाढ झोप लागत नाही? 'या' ७ कारणांमुळे होऊ शकते झोप खराब; जाणून घ्या उपाय

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

SCROLL FOR NEXT