Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; शेतमजुरांची पळापळ

Nandurbar news : नंदुरबार जिल्ह्यातील न्याहली शिवारात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास बिबट्या दिसून आला. शेतात शेतमजूर काम करीत असताना अचानक बिबट्या समोर आला

Rajesh Sonwane

न्याहली (नंदुरबार) : शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात तरुण शेतकरी जखमी झाला आहे. (Leopard Attack) बिबट्याने हल्ला केल्याने सोबत  असलेल्या (Nandurbar) शेतमजुरांची पळापळ सुरु झाली. बिबट्याने हल्ला केल्याची ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील न्याहली शिवारात घडली. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यातील न्याहली शिवारात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास बिबट्या दिसून आला. शेतात शेतमजूर काम करीत असताना अचानक बिबट्या (Leopard) समोर आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. या दरम्यान बिबट्याने शेतकऱ्यांवर (Farmer) हल्ला करू लागला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या जवळच असलेल्या मक्याच्या शेतात पळून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात रवींद्र माळी हा तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिबट्या आल्याची माहिती वन विभागाला (Forest Department) देण्यात आली. या दरम्यान ग्रामस्थांनी बिबट्या लपलेल्या मक्याच्या शेताला चहुबाजूंनी पाळत ठेवली. दरम्यान, वन विभागाला माहिती कळविण्यात आली. दोन तासांनंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने बिबट्यावर पाळत ठेवून ग्रामस्थांना घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने मोहीम सुरू केली. मक्याच्या शेताजवळ पिंजरा लावण्यात आला. तसेच मशाल पेटवून बिबट्याचा शोध घेण्यात आला. सायंकाळी वन विभागाच्या पथकाने शेतात बिबट्या नसल्याचे सांगत पथक निघून गेले. परिसरात बिबट्या आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री भरत गोगावले यांच्या पालक मंत्री घोषणेनंतर महाडमध्ये जल्लोष

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT