Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: जिल्‍ह्याची आरोग्‍य यंत्रणा कोलमडली; आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

जिल्‍ह्याची आरोग्‍य यंत्रणा कोलमडली; आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत प्रशासनाने दखल घेतलेली नाही. यामुळे समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हा परिषद (Zilha Parishad) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (Saam Breaking News)

नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) आरोग्य विभाग उपकेंद्र अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह व हार्ड शिप आणि दरमहा मिळणारे वेतन वेळेत दिले जात नाही. सदर वेतन महिन्याच्या १० तारखेच्‍या आत द्यावे. या प्रमुख मागण्यासाठी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ३४ आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याचा समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाशी काही संबंध नाही असा दावा संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी केला आहे.

वेतन अदा

समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद धरणे आंदोलनामुळे आरोग्य सुविधेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता. सदर कर्मचाऱ्यांना वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सेंटिव्ह व हार्डशिप व वेतन अदा केलेले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आर्थिक नियोजनानुसार सदर कार्यवाही सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अहवाल शनिवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून लवकरच पुढील कार्यवाही देखील सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आंदोलनातील कर्मचाऱ्यांना ‘नो वर्क नो पे’

धरणे आंदोलनावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधा बाबत विचार करून आंदोलन मागे घेत काम करावे. प्रशासन आपले काम करत असून धरणे आंदोलन करणे योग्य नसल्याचेही सांगितले आहे. धरणे आंदोलनावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना नो वर्क नो पे दिले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास २०७ समुदाय आरोग्य कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत काम बंद आंदोलनावर ठामपणे बसले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT