Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

तक्रारदारांच्या समस्येकडे दुर्लक्ष; लोकशाही दिनात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध

तक्रारदारांच्या समस्येकडे दुर्लक्ष; लोकशाही दिनात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध

दिनू गावित

नंदुरबार : सामान्य जनतेच्या शासकीय कार्यलयासंबंधी असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर राज्यपाल यांच्या आदेशानुसार लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे बंधनकारक असतांना अधिकारी नेहमीच राज्यपालांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत लोकशाही दिनाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र नंदुरबार (Nandurbar) येथील लोकशाही दिनास पहावयास मिळाले आहे. नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ता मंगेश येवले यांनी खुर्ची वर न बसता उभे राहून आपली तक्रार मांडली आणि अनुपस्थित असलेल्या अधिकार्याचा निषेध केला आहे. (nandurbar news Ignoring the complainant problem Protest of officials)

सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांच्या तक्रारीवर योग्य उत्तर मिळत नसल्‍याचा अनुभव त्यांना लोकशाही दिनामध्ये दिसून आला आहे. नवापूर (Navapur) नगर परिषद हद्दीतील मरीमाता मंदिर परिसरात पर्यटन विकास अंतर्गत १ कोटी दहा लाख रुपयांचा खर्च करून जलक्रीडा, कला दालन, सभागृह, बगीचा, फलोत्पादन करणे, संरक्षण भिंत इ. कामासाठी निधी वापरला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवले. प्रत्यक्षात मात्र अनेक कामे अपूर्ण असतांना ठेकेदारांना पैसे वाटून निधीचा अपव्यय केला असल्याचा आरोप करत लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवापूर नगर परिषदेला एकतर्फी हस्तांतरण केले असल्याचे मौखिक स्वरूपात उत्तर दिल्याने सर्वच अवाक झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ह्या अनपेक्षित उत्तरे देऊन वेळकाढू धोरणामुळे तक्रारदार मंगेश येवले संतप्त होऊन लोकशाही दिनात संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करत उभे राहून आपले गऱ्हाणे मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT