Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: मोटारसायकलसाठी पती– पत्‍नीचं टोकाचं पाऊल; मृतदेह बघताच वडिलांनीही दिला जीव, परिसरात खळबळ

मोटारसायकल घेऊन दिली नाही म्हणून पती– पत्‍नीची आत्‍महत्‍या; मृतदेह बघताच वडिलांनीही दिला जीव

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवापूर (Navapur) शहरातील तीनतेंभा भागातील रहिवासी असलेले सावंत सय्यद गावित त्यांच्या पत्नी रोशनी सावंत गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित या तिघांनी रात्रीच्या सुमारास फुलफळी भागात असलेल्या (Railway) रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

नवापूर शहरातील तीनटेंभा भागातील रहिवासी सावंत सय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन मोटरसायकलीची मागणी केली होती. मात्र वडिलांनी ती घेऊन दिली नाही. (Nandurbar News) या विषयावरून रागाच्या भरात सावंत गावित आणि त्यांची पत्नी रोशनी गावित यांनी फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. हे चित्र पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली.

सदरच्‍या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी तपास करत घटनेचा पंचनामा करून तिघही मृतदेह नवापूर उपजिल्हा रुग्णालय पाठविले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

SCROLL FOR NEXT