Navapur Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Navapur Heavy Rain : नवापूर शहरात मध्यरात्रीच्या पावसाने दाणादाण; अनेक घरात शिरले आठ फुटापर्यंत पाणी, जनजीवन विस्कळीत VIDEO

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर व तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस आला, रात्रीच्या या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नवापूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या पावसामुळे नवापूर शहरात असलेल्या एका इस्लामपुरात देवल्फळी भागात असलेल्या घरांमध्ये आठ फुटांपर्यंत पाणी गेले होते. यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य संपूर्ण पावसात भिजल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे. (Heavy Rain) मुसळधार पाऊस होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर व तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस आला, रात्रीच्या या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे सुरत- भुसावळ रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. तर धुळे- सुरत महामार्गावर देखील पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर नवापूर शहराच्या (Nandurbar) अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. 

महिलांचे अश्रू अनावर 

मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यामुळे दाणादाण उडाली असून नवापूर (Navapur) शहरातील अनेक भागात घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. काही घरांमध्ये तर अगदी सात ते आठ फुटापर्यंत पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांनी मध्यरात्री आपला जीव वाचवून बाहेर पडले. मात्र यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती देताना महिलेला अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मृत्यूचा सापळा ठरलेल्या पुलावरून कालव्यात कार कोसळली, अपघातात तिघे गंभीर जखमी

Monday Horoscope: कामाच्या नव्या संधी मिळतील, ५ राशींचे प्रेमसंबंध सुधारणार; वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Summer Konkan Tourism : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

काँग्रेसचा वरिष्ठ नेता हरपला; पक्षाला मोठा हादरा

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब', बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT