Nandurbar Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Heavy Rain : नंदुरबारमध्ये मुसळधार..पूल वाहून गेल्याने बारा गावांचा संपर्क तुटला; दुचाकीसह तरुण पडला पुराच्या पाण्यात

Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यातील बोरकी तीन गुनिया पाडा ते देव मोगरा दरम्यान असलेल्या रस्त्यावर पूल अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील मोरखी तीन गुण्या पाडा ते देव मोगरा दरम्यान असलेल्या पुल पुरामुळे वाहून गेला. त्यामुळे अंदाज न आल्याने मोटर सायकलसह दुचाकीस्वार वाहून जात होता. मात्र नागरिकांच्या मदतीने मोटरसायकल वाचवण्यात यश आले.

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील बोरकी तीन गुनिया पाडा ते देव मोगरा दरम्यान असलेल्या रस्त्यावर पूल अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होता. या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नदीला पूर आला असून या पुरात नदीवरील हा पूल वाहून गेला. या दरम्यान एक प्रवासी आपल्या दुचाकीने जात असताना पुलावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तो नदीच्या प्रवाहात वाहू लागला. दरम्यान नागरिकांच्या मदतीने दुचाकीसह त्याला बाहेर काढण्यात आले. 

१२ गावांचा संपर्क तुटला 

या नदीवरील पूल वाहून गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. पूल मंजूर असूनही तयार करण्यास दिरंगाई झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या ठिकाणी दुचाकीस्वार मोठी कसरत करत गावकऱ्यांच्या मदतीने दुचाकी एका बाजू होऊन दुसऱ्या बाजूला घेऊन जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT