Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Sarangkheda Police : दुचाकीवर छुप्या पद्धतीने गांजा तस्करी; सारंगखेडा पोलिसांची कारवाई, एकाला घेतले ताब्यात

Nandurbar News : शिरपूर ते शहादा दरम्यान गांजाची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर सारंगखेडा पोलिस गेल्या दोन दिवसांपासून गांजाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : अंमली पदार्थ तसेच गांजा तस्करी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. अशाच प्रकारे शहादा तालुक्यात होत असलेली गांजा तस्करी सारंगखेडा पोलिसांनी रोखली आहे. या कारवाईत सुमारे एक लाख दोन हजार ५०० रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अमरद बारंजवण परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश नावरे यांना शिरपूर ते शहादा दरम्यान गांजाची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर सारंगखेडा पोलिस गेल्या दोन दिवसांपासून गांजाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते. पहिल्यांदा कोणतेही यश आले नाही. मात्र, सापळा लावून संशयिताला शिरपूर दिशेने येताना गांजासह तस्करी करताना बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार सारंगखेडा पोलिसांनी सापळा रचला. त्यात संशयित दुचाकीवर गांजा घेऊन येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली असता त्याच्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेला पाच किलो वजनाचा गांजा मिळून आला. शिरपूर रस्त्यावरिल अमरद टेंकवाजवळ पोलिसांनी हि कारवाई केली आहे. 

मुद्देमालासह एकजण ताब्यात 

सारंगखेडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच किलो गांजा आणि दुचाकी असा एक लाख दोन हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर गांजा तस्करी करणाऱ्या मधूसिंह गायकवाड (रा. काटविहीर, ता. शहादा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईमुळे पुन्हा एकदा गांजाची तस्करी सुरूच असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT