Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : देशातील पहिलं आधार कार्ड धारक महिला नऊ महिन्यांनी ठरली लाडकी बहीण; योजनेसाठी करावा लागला मोठा संघर्ष

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात राहणाऱ्या आदिवासी महिला रंजनाबाई सोनवणे यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हस्ते पहिलं आधार कार्ड देऊन आधार कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: देशात प्रत्येक भारतीय नागरिकांची ओळख म्हणून आधार कार्ड नोंदणी सुरु करण्यात आली होती. काँग्रेस सरकारच्या काळात नोंदणीला सुरवात केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागातून याची सुरवात झाली. यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिला पहिली आधारकार्ड धारक ठरली होती. मात्र याच महिलेला राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल नऊ महिन्यांनंतर मिळाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात राहणाऱ्या आदिवासी महिला रंजनाबाई सोनवणे यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हस्ते पहिलं आधार कार्ड देऊन आधार कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र त्याच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात फिराफिर करावी लागल्याची वेळ आली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.  

योजनेच्या लाभासाठी फिरफिर 

राज्याची विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला १५०० रुपयांचा लाभ दिला जात होता. अर्थात सदरची योजना सुरु होण्यास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी झाला आहे. या दरम्यान अनेकांचे अर्ज रद्द देखील करण्यात आले आहे. मात्र देशातील पहिले आधार कार्ड धारक आदिवासी महिलेला योजनेच्या लाभासाठी फिराफिर करण्याची वेळ आली होती. 

महिलेला १३ हजार रुपयांचा चेक 

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना या गोष्टीबद्दल माहिती झाल्यानंतर त्यांनी तात्काळ पाठपुरवठा करत या आदिवासी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. रंजनाबाई सोनवणे या महिलेला नुकताच लाडकी बहीण योजनेचे १३ हजार ५०० रुपयांचा चेक देण्यात आला आहे. उशिरा का होईना पण लाडकी बहिणीचा लाभ मिळाल्याने रंजनाबाई सोनवणे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT