Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : विधानसभेत पिता-पुत्र आमनेसामने; शहादा- तळोदा मतदारसंघात रंगणार लढत

Nandurbar News : २०१९ च्या विधानसभा निवडणूक भाजपच्या वतीने उदयसिंग पाडवी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर त्यांचेच पुत्र राजेश पाडवी यांना भाजपने तिकीट दिले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पक्षांकडून उमेदवारी निश्चिती केली जात आहे. मात्र अद्याप कोणत्याही मतदार संघाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु शहादा तळोदा मतदार संघात पिता- पुत्राची लढाई पाहायला मिळणार आहेत. यामुळे ही लढत अगदी चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील शहादा- तळोदा मतदार संघाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्याच पुत्रा विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक (BJP) भाजपच्या वतीने उदयसिंग पाडवी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर त्यांचेच पुत्र राजेश पाडवी यांना भाजपने तिकीट दिले होते. मात्र नाराज झालेले उदयसिंग पाडवी यांनी थेट काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात नंदुरबारमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश मिळालं नाही.  

आता पुन्हा एकदा उदयसिंग पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी आता शहादा- तळोदा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात आता पिता- पुत्राची लढाई पाहायला मिळणार आहे. तर ही पिता पुत्राची लढाई नसून विचारांची लढाई असल्याचं माझी आमदार उदयसिंग पाडवी यांनी म्हटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT