Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : घरासमोरील रस्त्यावर घातले तार कंपाउंड; मालकी हक्क दाखवत कुटुंबीयांचा रस्ताच केला बंद

Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथील एका कुटुंबाच्या घरासमोरील रस्त्यावर मालकी हक्क दाखवीत चक्क रस्त्यावर तार कंपाउंड टाकले आहे. असा प्रकार करून या कुटुंबीयांचा रस्ताच बंद

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: सार्वजनिक रस्ता असताना त्यावर मालकी हक्क दाखविण्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील नवापाडा येथे समोर आला आहे. घरासमोरील या रस्त्यावर मालकी हक्क दाखवीत चक्क रस्त्यावर तार कंपाउंड टाकण्यात आले असून या कुटुंबीयांचा रस्ताच बंद केल्याचा खळबळजनक प्रकार या गावात घडला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथील एका कुटुंबाच्या घरासमोरील रस्त्यावर मालकी हक्क दाखवीत चक्क रस्त्यावर तार कंपाउंड टाकले आहे. असा प्रकार करून या कुटुंबीयांचा रस्ताच बंद केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रस्त्यावर ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे विकास काम सुरू आहे. रस्त्याचे काँक्रेटीकरण केले जात असताना ते बंद पाडण्यात आले. 

रस्त्यावरून वाहन वापरण्यासाठी अडचण 

काम बंद पाडून या रस्त्यावर एकाने आपला मालकी हक्क दाखवत रस्त्याचे काम बंद पाडून या रस्त्यावर सिमेंटचे पाईप उभे करून लोखंडी जाळी लावून कंपाउंड करून घेतली. त्यामुळे चक्क एका कुटुंबाच्या दैनंदिन वापराच्या रस्ताच बंद झाला आहे. या कुटुंबीयांना प्रवेश करण्यासाठी तसेच त्यांची दुचाकी, चार चाकी वाहन ये जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

न्यायालयात कुटुंबीयांची धाव

घरासमोरील वापण्यासाठी असलेला रस्ता बंद झाल्याने सदरच्या प्रकाराबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे कुटुंबीयांनी रस्त्यासाठी न्याय मागितला आहे. मात्र ग्रामपंचायकडून अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे परिवाराची अडचण होत आहे. दरम्यान या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेऊन रस्त्यासाठी दाद मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT