electric car 
महाराष्ट्र

युवकाचा देशी जुगाड..कार धावते एक रूपयात ५० किमी

नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील अर्जुन चौरे या २६ वर्षीय युवकाचे शिक्षण नंदुरबार येथील शासकिय आयटीआय इलेक्‍ट्रील्समध्ये झाले आहे.

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील एका २६ वर्षीय युवकाने चक्क भंगारातील साहित्य वापरुन तीन चाकी इलेक्ट्रिक कार बनविली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करुन साकारण्यात आलेली ही कार ताशी सुमारे ४५ किमी वेगाने सुसाट धावते. तेही १ रूपयात ५० कि.मी. चला तर पाहूया कारचा देशी जुगाड. (nandurbar-news-electrician-young-boy-create-electrical-car)

नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील अर्जुन चौरे या २६ वर्षीय युवकाचे शिक्षण नंदुरबार येथील शासकिय आयटीआय इलेक्‍ट्रील्समध्ये झाले आहे. सध्या तो नंदुरबार पालिकेच्या झराळी येथील वॉटर सप्लाय पंपिंग स्टेशनवर खासगी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. यातून त्याला मिळणारे मानधन तोकडेच आहे. घरी आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

घरची परिस्‍थीती बेताची

अर्जुन चौरे याच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. मात्र यात उदरनिर्वाह चालविणे कठीत जाते. त्यातच आता दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाल्याने याचे चटके अर्जुनला देखील सोसावे लागत आहे. अजेपूरहून नंदुरबारला पाणी पुरवठा करणार्‍या झराळी प्रकल्पापर्यंत अर्जुन जुन्या दुचाकीने ये- जा करीत होता. मात्र आता इंधन दरवाढ झाल्याने त्याला मिळणार्‍या मानधनात दुचाकी वापरणे कठीण झाले होते.

पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी प्रयोग

नंदुरबार जिल्ह्यात सध्या १०४ रूपयांवर पेट्रालचे दर झाले आहेत. यामुळे त्याने पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी काहीतरी नवीन शोधावे याचा विचार करत असतांना एक भन्नाट कल्पना सुचली. सध्या बाजारात बॅटरीवर चालणारी स्कुटी विक्रीला आहे. बॅटरीवर चालणार्‍या कारचे प्रयोग देखील होत आहेत. असे असले तरी भंगारातून विविध साहित्य गोळा करुन लिथियम बॅटरीचा वापर करीत तयार केलेली तीन चाकी कार सध्या परिसरासाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.

अशी साकारली कार

अर्जुन झराळी येथील पंपिंग स्टेशनवर कार्यरत असल्याने त्याला विजेची उर्जा प्रवाहित होवून कोठे आणि कसा परिणाम घडविते याचा अभ्यास होता. त्याच्या ज्ञानाच्या बळावर भंगारातील टाकाऊ चाक, टायर, स्टेअरिंग मिळविले. त्यांचा जुगाड करीत चालक व एक जण मागे बसू शकेल अशा आसन व्यवस्थेलाच खालून रॉडचा आधार देत तीन चाकी कार साकारली. यात लिथियम बॅटरीचा वापर करण्यात आला. सदरची कार तासभर चार्जिंग केल्यावर ४५ ते ५० कि.मी. अंतर ताशी ४५ कि.मी.वेगाने धावू शकते. यासाठी युवकाने नंदुरबार येथुन भंगार साहित्याची खरेदी करत तीन चाकी कार तयार केली. यासाठी जवळपास ४० हजाराचा खर्च आला. अवघ्या १५ दिवसात त्याने ही तीन चाकी कार तयार केली.

पुढचे लक्ष सोलरवरची कार

लवकरच कमी खर्चात इंधनाचा वापर न करता वीजेवर तसेच सोलरवर चालणारी कार तयार करण्याचा अर्जुन चौरे याचा मानस आहे. ही कार चालतांना कुठलाही आवाज येत नाही व ध्वनी प्रदुषनही होत नाही. ही आगळ्या वेगळ्या कारची सर्वंत्र चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT