Diwali Festival Saam tv
महाराष्ट्र

Diwali Festival: झेंडू फुलांची मागणी वाढली; 50 ते 60 रुपये दराने विक्री

झेंडू फुलांची मागणी वाढली; 50 ते 60 रुपये दराने विक्री

दिनू गावित

नंदुरबार : दिपोत्‍सवानिमित्‍ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात आजच्‍या लक्ष्‍मीपुजनानिमित्‍ताने झेंडूंच्‍या फुटलांची मागणी अधिक वाढली आहे. शहरात जिकडे तिकडे पिवळधम्‍म फुलांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. मागणी वाढल्‍याने झेंडूंच्‍या फुलांचे दर देखील वाढली असून आज सकाळपासून ५० ते ६० रूपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री होत आहे. (Letest Marathi News)

दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन व वाहनांच्या पूजेसाठी झेंडू फुलांची मागणी वाढली असून झेंडू फुलांच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या आहे. तसेच शेतात लागवड केलेले शेतकरी बांधव झेंडू फुले विक्री करण्यासाठी थेट बाजारात दाखल झाले आहे. कोरोना काळात गेल्या दोन वर्षानंतर यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असून लक्ष्मीपूजन तसेच वाहनांची पूजा करण्यासाठी भाविक झेंडू फुलांची खरेदी करताना दिसून येत आहे. यंदा झेंडू फुले 50 ते 60 रुपये दराने बाजारात विक्री होत आहे. ग्राहकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असून दर समाधान कारक असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Maharashtra News Live Update: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT