Liquar Ban Saam tv
महाराष्ट्र

गाव पाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट..बचतगट महिलांनी घेतल्‍या लाठ्या काठ्या

गाव पाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट..बचतगट महिलांनी घेतल्‍या लाट्या काठ्या

दिनू गावित

नंदुरबार : शहादा तालुक्यातील शेवटचे गाव गोणोर अगदी मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा विक्रीसाठी गावात येत असतो. त्याच प्रकारे हातभट्टीची दारू देखील गावात तयार होत असल्याने अनेक परिवारांचा संसार दारूमुळे उध्वस्त होत आहे. गावात दारूबंदी व्हावी अशी मागणी वारंवार ग्रामपंचायत सभेत सरपंच व प्रशासनाकडे केली आहे. मात्र दारूबंदीवर (Alcohol) तोडगा निघत नसल्याने बचत गटाच्या महिलांनी युवकांना सोबत घेत हातात लाठ्याकाठ्या घेऊन दारूबंदीचा नारा दिला. (nandurbar news Destroyed the kiln liquor in the village)

दारूबंदीसाठी महिला व युवकांचा ताफा बघून अवैध दारू व्यवसायिकांना चांगलाच घाम फुटला होता. दरम्यान गावात अवैध पद्धतीने दारू विक्री (Nandurbar News) करणाऱ्या नागरिकांना चौकात बोलून भर सभेत पूर्णपणे दारूबंदी करण्याचा सज्जड इशारा दिला.

दारू ओतली जमिनीवर

गावातील सर्व हातभट्टीची दारू महिलांनी नष्ट केली. प्लास्टिक पिशवी व रबरी ट्यूबमध्ये ठेवलेली दारू सदर महिला व युवकांनी जमिनीवर ओतून नष्ट केली. गावाच्या विकासासाठी महिला व युवकांनी घेतलेल्या या दारूबंदीच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाच्या अनुपस्थित दारू नष्ट करून सभेद्वारे नागरिकांना दारूबंदीचा दिलेला आदेश पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT