Nandurbar ZP 
महाराष्ट्र

पंचायती राज समितीद्वारे झाडाझडती; आमदारांशी अनौपचारीक चर्चा

पंचायती राज समितीद्वारे झाडाझडती; आमदारांशी अनौपचारीक चर्चा

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे पंयाचती राज समिती आजपासुन नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आहे. सकाळच्या सत्रात समितीने जिल्ह्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांसमवेत अनौपचारीक चर्चा केली. तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्यांसमवेत चर्चा केली. सन २०१६-१७ च्या लेखा परिक्षा परिच्छेदात संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांची साक्ष सुरु आहे. (nandurbar-news-Deforestation-by-Panchayati-Raj-Samiti-Informal-discussions-with-MLAs)

पंचायती राज समितीचे जवळपास १४ सदस्य उपस्थित असुन जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. उद्या (ता.२१) समिती जिल्ह्याभरातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायती यांना भेटी देत झाडाझडती घेणार असल्याची माहीती देण्यात आली आहे. शिवसेना आमदार संजय रायमुलकर हे समितीचे प्रमुख आहेत.

अधिकाऱ्यांशी औपचारिक चर्चा

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या असलेल्या पंचायत समितीच्या सदस्यांनी आज दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे अधिकार्‍यांशी औपचारिक चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेतील यहा मोगी सभागृहात ११ वाजेपासून समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका सुरू केल्या आहे. या बैठकीमध्ये २०१६-१७ च्या लेखापरीक्षणाचे पुनर्विलोकन अहवालातील नंदुरबार जिल्हा परिषदेच्या संबंधित परिच्छेद या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोबत इतर अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. यानंतर समितीच्या दुसऱ्या दिवसा संदर्भात चर्चा करून भेट देण्यात या वयाच्या पंचायत समिती ठरवण्यात येणार आहे. पंचायत राज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्यासह १४ सदस्यांनी दौऱ्यामध्ये उपस्थिती लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT