St Strike saam tv
महाराष्ट्र

St Strike: दोन संपकरी कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू; बडतर्फी कारवाईच्या तणावात हृदयविकाराचा झटका

दोन संपकरी कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू; बडतर्फी कारवाईच्या तणावात हृदयविकाराचा झटका

दिनू गावित

नंदुरबार : राज्‍य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेल्‍या अडीच महिन्‍यांपासून संपावर आहेत. तोडगा निघत नसल्‍याने कर्मचारी संपावर ठाम असून कामावर रूजू न होत असलेल्‍यांवर कारवाई केली जात आहे. अशीच बडतर्फीची कारवाई झालेल्‍या दोन कर्मचारींचा हृदयविकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यू झाल्‍याची घटना नंदुरबार (Nandurbar) येथे घडली आहे. (nandurbar news Death of two st employee Heart attack in the stress of side action)

एसटी महामंडळातील (MSRTC) कर्मचारी विलनीकरणाच्‍या मागणीसाठी संपावर (St Strike) आहेत. राज्‍य शासन तोडगा काढत नसल्‍याने कर्मचारी संप मागे घेण्याच्‍या तयारीत नाही. यामुळे महामंडळाने देखील कारवाईचा बडगा उचलला आहे. या कारवाईच्‍या तणावातून राज्‍यातील अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू झाला असून आज देखील नंदुरबार बस आगारात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू झाला.

एकाच दिवशी दोघांचा मृत्‍यू

नंदुरबार बस आगारातील दोन संपकरी कर्मचाऱ्यांचा एकाच दिवशी ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यु झाला. वाहक युवराज सुका भिल (वय ५२) व चालक अनिल चौरे वाघाळेकर (वय ४५) असे मृत संपकरी कर्मचाऱयांची नावे आहे. दोघे कर्मचारी बडतर्फीच्या कारवाईने तणावात असल्याने त्‍यांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बसस्‍थानकात पोलिसांचा फौजफाटा

दोन कर्मचारींचा मृत्‍यू झाल्‍यानंतर जोपर्यत या प्रकरणी सदोष मनुष्‍यवधाचा गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यत शवविच्छेदन होवु देणार नसल्‍याची कुटुंबांनी आक्रमक भुमिका घेतली. शिवाय संपकरी कर्मचारी देखील आक्रमक झाल्‍यामुळे बसस्‍थानक आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे नंदुरबार बसस्थानकात आंदोलनस्थळी पोलीस फौजफाटा तैणात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात तडीपार असलेल्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT