Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: वादळी वाऱ्याने नुकसान; वीज पडून बैल व व्यक्तीचा मृत्‍यू

वादळी वाऱ्याने नुकसान; वीज पडून बैल व व्यक्तीचा मृत्‍यू

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्‍ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले आहेत. तर वीज (Nandurbar News) पडून एक व्यक्ती व एक बैल ठार झाला आहे. (Nandurbar news Damage caused by strong winds Death of an ox and person due to lightning)

नवापूर (Navapur) तालुक्यातील पुर्व पट्ट्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे देवळीपाडा निमदर्डा परिसरात विजेचा ट्रान्सफर कोसळून नुकसान झाले आहे. तसेच देवळीपाडा पांढरफळी, निमदर्डा, सोनखांब, तिलासर या गावांमध्ये रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. तसेच योगेश धर्मा गावित, वेल्जी गावित, निशार गावित राहणार सोंनखांब व शांत्या जेरमा गावित राहणार निमदर्डा, या व्यतिरिक्त पाच ते सहा गावातील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पाहणी करून काही ठिकाणी पंचनामे केले आहे. तर ज्या ठिकाणी पंचनामे झाले नसेल त्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी (farmer) केली आहे.

झोपडीवर पडली वीज

शहादा (Shahada) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव शहाणा गावातील वनजमीन जंगल परिसरात शेतामध्ये झोपडी करून राहत असलेले दयाराम भिल (वय 54, रा. खेतिया) त्यांच्या झोपडीजवळ वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दयाराम यांच्या झोपडीजवळ बांधलेला एक बैल देखील विजेमुळे मृत्यू झाला आहे.

बळीराजा अजूनही चिंतेत

पावसाचा जून महिना संपत आला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. ठराविक भागांमध्ये पाऊसाने हजेरी लावल्याने दिवसेंदिवस पेरण्या लांबत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT