Corona Update 
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसात नंदुरबार, नवापूर आणि शहादा तालुक्यातून ९ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र नागरिक लग्नसमारंभ आणि बाजारात फिरताना कोरोना (Corona) नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. (nandurbar news corona update last three days corona positive patient groth)

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्याला लाटेनंतर अनेक वेळा जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या शून्यावर गेली होती. परंतु कोरानाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून जिल्ह्यात सध्या एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आतापर्यंत 37 हजार बाधित

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ५८७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ३६ हजार ६३६ रुग्ण उपचारा दरम्यान बरे झाले असून जिल्ह्यात ९५१ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात सध्या १२ कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट

तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा करा वापर; घरीच बनवा 5 सोपे फेसपॅक

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT