corona 
महाराष्ट्र

Nandurbar Corona : एकाच दिवसात १३ पॉझिटीव्‍ह; ॲक्टिव रुग्णांची संख्या २७ वर

एकाच दिवसात १३ पॉझिटीव्‍ह; ॲक्टिव रुग्णांची संख्या २७ वर

दिनू गावित

नंदुरबार : कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत वाढत नसलेल्‍या नंदुरबार जिल्‍ह्यात देखील कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जिल्‍ह्यात सोमवारी एकाच दिवसात १३ पॉझिटीव्‍ह रुग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्‍ह्यात ॲक्टिव (Corona) रुग्णांची संख्या २७ वर पोहचली आहे. (Nandurbar news Corona update 13 positives in a one day)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत २२ ने वाढ झाली आहे. जिल्हावासीयांसाठी पुन्हा धोक्याची घंटा आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत आलेल्या अहवालात नंदुरबार आणि शहादा (Shahada) तालुक्यातील एकूण १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग (Department of Health) व जिल्हा वासीयांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

तरीही बेफिकरी

राज्‍यातील अनेक भागात कोरोनाचा विस्‍फोट होवू लागला आहे. रूग्णांची संख्‍या झपाट्याने वाढत असताना देखील नागरीकांमध्‍ये बेफिकरी दिसून येत आहे. गर्दी करत असताना या गर्दीत देखील विनामास्‍क अगदी बिनधास्‍त फिरत असल्‍याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. नागरीकांपुढे प्रशासन देखील हतबल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT