Nandurbar Congress Saam tv
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

दिनू गावित

नंदुरबार : काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयामार्फत हेतू पुरस्कर होत असलेल्या प्रदीर्घ चौकशीच्या व केंद्र शासनाच्या दडपशाहीचा निषेध करणे बाबतचे नंदुरबार (Nandurbar) जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नंदूरबार येथील काँग्रेस (Congress) कमिटीच्या जिल्हा कार्यालयात आंदोलन करीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. (nandurbar news Congress protests against Rahul Gandhi ED probe)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीमार्फत नोटीस देण्यात आली. त्यानुसार दिल्ली येथे सक्त वसूली संचालनालयाच्या कार्यालयात 13 जुन रोजी चौकशीसाठी ते उपस्थित राहिले. मात्र 13 जूनपासून सुरु करण्यात आलेली त्यांची चौकशी सतत तीन दिवस सुरू ठेवून त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ केंद्रीय नेत्यास मुद्दामहून सतत चौकशीसाठी बोलावणे. यासह भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयास पोलीसांकडून घेराव घालणे, पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना अकारण पोलीसांकडून मारहाण होणे व त्यांना डांबुन ठेवणे असे प्रकार घडले आहेत. केंद्रातील सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्व सामान्य जनतेच्या प्रतिनिधींना आंदोलन करण्यापासून परावृत्त करीत असून या प्रकारातून घटनेची पायमल्ली करीत आहे. या दडपशाहीचा जिल्हा काँग्रेस कमिटी नंदुरबार निषेध करीत आंदोलन केले.

उपजिल्‍हाधिकारींना निवेदन

पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात डांबुन ठेवून त्यांना मारहाण केली जात आहे. त्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेवून त्यांचे विरोधात भारतीय संहितेच्या प्रचलित कलमाखाली गुन्हे नोंदवून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन मागणी करण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO चे हे फिचर वापरून हरवलेले पीएफ अकाऊंट मिनिटांत शोधा

Deputy Collector : २ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई; महसूल विभागात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापूर- मुंबईहून गारगोटीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा पहाटे अपघात

Nausea : पोट बिघडल्यामुळे मळमळ होतंय? करा 'हे' रामबाण उपाय, स्वयंपाकघरातील पदार्थ मिनिटांत करतील जादू

Metkut recipe : गरमागरम भात अन् चटपटीत 'मेतकूट'; पावसाळ्यात करा अस्सल गावरान बेत, वाचा अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT