Nandurbar unlock 
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात दुकाने रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

नंदुरबार जिल्ह्यात दुकाने रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

दिनू गावित

नंदुरबार : कोरोना बाधितांची संख्‍या आटोक्‍यात आली आहे. यात बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्‍यातील काही जिल्‍ह्यातील निर्बंध शिथील केले जाणार आहेत. त्‍यानुसार नंदुरबार जिल्‍ह्यात अत्‍यावश्‍यक सेवेच्‍या दुकानांसह सर्व दुकाने रात्री आठपर्यत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्‍हाधिकारी मनिषा खत्री यांनी काढले. (nandurbar-news-collector-manisha-khatri-order-district-unlock)

राज्य शासनाने आठवड्याच्या सरासरीनुसार कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेडचे प्रमाण या निकषांवर पाच स्तर निश्चित केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील निर्बंध शिथिल अथवा कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसह इतर सर्व दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री ८ आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी खत्री यांनी दिले आहेत. जिल्ह्यात सायंकाळी ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आणि सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील.

रविवार संपुर्ण बंद

अत्यावश्यक सेवेची दुकाने रविवारी वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतील. सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग हे सर्व दिवशी व्यायामासाठी सुरू राहतील. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये १०० टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. ज्या कार्यालयाची कामे घरी बसून करता येतील ती तशीच सुरू ठेवता येतील. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह तसेच कोविड वर्तवणुकीचे पालन करण्याच्या अटीवर सुरू असेल. त्यानंतर घरपोच सेवा देण्यास मुभा असेल.

या सेवांबाबतचा निर्णय

कृषि व कृषि पुरक सेवा, नागरी कामे, औद्योगिक सेवा, माल वाहतूक सर्व दिवशी सुरु राहील. व्यायामशाळा, योगा केंद्र, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा हे ५० टक्के क्षमतेसह दुकानात येणाऱ्या ग्राहकांची पुर्व नियोजित वेळ ठरविण्याच्या अटीवर सुरु राहतील. परंतु त्याठिकाणी वातानुकूलीन यंत्र बंद राहील.

हे मात्र अजूनही बंदच

जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व सिनेमा हॉल, नाट्यगृह, मल्टी प्लेक्स (स्वतंत्र किंवा मॉल्स ) पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील. शाळा महाविद्यालयास उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील. वाढदिवस, संमेलन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणुक, निवडणूक व निवडणूका प्रचार मिरवणूका, निषेध मोर्चा अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध कायम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT