Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : जमिनीच्या फेर मोजणीसाठी तीन हजाराची लाच; एसीबीकडून शिपाई ताब्यात

Nandurbar News : ४ ऑक्टोंबर २०२३ ला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव तक्रारदार यांना सदरची जमिनीची पुन्हा फेर मोजणी करावयाची असल्याने यासाठीच्या अर्जासह तक्रारदार भूमी अभिलेख कार्यालयात गेले

Rajesh Sonwane

शहादा (नंदुरबार) : वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीची फेर मोजणी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक (Nandurbar) विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत ताब्यात घेण्यात आले आहे. (Live Marathi News)

सावखेडा (ता. शहादा) येथील विनोद बाळू शिंदे (वय ४२) असे लाच घेणाऱ्या शिपायाचे नाव आहे. तक्रारदाराची वडिलोपार्जित शेत जमिन असून या जमिनीची ४ ऑक्टोंबर २०२३ ला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आली होती. (ACB) परंतु काही कारणास्तव तक्रारदार यांना सदरची जमिनीची पुन्हा फेर मोजणी करावयाची असल्याने यासाठीच्या अर्जासह तक्रारदार भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमची जमीन शेतात येऊन मोजणी करून देतो. त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला तीन हजार रुपये देऊन द्या असे सांगून लाचेची मागणी केली. १६ मार्चला शिपाई शिंदे यास तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. हि कारवाई (Nashik) नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, हेमंत महाले, सुभाष पावरा आदींनी कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमधील सकल मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT