Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: रेल्वे कॉलनीच्‍या गटारात आढळला बालिकेचा मृत्यूदेह

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील कंजरवाडा आणि रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षाच्या बाजूला असलेल्या एका गटाराच्या टाकीत अडीच ते तीन वर्ष असलेल्या बालिकेचा (Nandurbar News) मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. (nandurbar news body of a girl was found in the drainage of Railway Colony)

कंजरवाडा परिसरातील राहणाऱ्या दोन व्यक्ती सकाळी शौचालयास आल्यावर त्यांना दुर्गंधीचा वास आल्याने गटाराच्या टाकीत पाहिले असता बालिकेचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ नंदुरबार (Nandurbar) पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे (Police) पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदानाच्या अहवालानंतर सदर बालिकेच्या मृत्यूबाबत अधिक स्पष्टता होणार आहे.

अत्‍याचाराची शक्‍यता

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर बालिकेचा मृतदेह कंजरवाडा आणि (Railway) रेल्वे कॉलनी परिसरातील रहिवाशांपैकी नाही. रेल्वेने प्रवास करणाऱ्या किंवा बाहेरगावावरून एखाद्या व्यक्तीने सदर बालिकेवर अत्याचार करून गटाराच्या टाकीत फेकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बालिकेच्या मृतदेहाच्या अवस्थेवरून तीन ते चार दिवसांपूर्वी घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.‌ सदर घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक अधिक तपास करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

Thane Election Voting LIVE : ठाण्यात ईव्हीएम मशीनचा खोळंबा, मतदार ताटकळले

Maharashtra Rain Update: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांमध्ये घातलं अवकाळी पावसानं थैमान?

Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे 'या' भागातील रस्ते राहणार बंद

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT