Bird Flu Saam tv
महाराष्ट्र

Bird Flu : पोल्ट्रीफार्मवरील कोंबड्यांचे घेतले रक्त नमुने; बर्ड फ्ल्यूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क

Nandurbar News : उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मची संख्या मोठी असून सर्वाधिक पोल्ट्रीफार्म हे नवापूर तालुक्यात आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात अनेक भागात बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. तर लातूरमध्ये कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पशु संवर्धन विभागाच्या वतीने पोल्ट्रीफार्म वरील कोंबड्यांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मची संख्या मोठी असून सर्वाधिक पोल्ट्रीफार्म हे नवापूर तालुक्यात आहेत. मागील काही वर्षांपूर्वी आलेल्या बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोल्ट्रीवरील कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या होता. आता राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा धोका वाढला असल्याने जिल्हा प्रशासन आतापासून सतर्क झाले आहे.  

जिल्ह्यात २० लाखांपेक्षा अधिक पक्षी 

नांदेड येथे बर्ड फ्ल्यू असल्याचे समोर आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाकडे १३१ पोल्ट्रीची नोंद आहे. त्यात २० लाखाच्या पेक्षा अधिक पक्षी आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून सुरक्षितते संदर्भात उपाय योजना करण्यात आल्याची माहिती पशु संवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी झालेले पोल्ट्री चालकांचे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत. 

रक्ताचे नमुने तपासणीसाठी 

राज्यात पसरत असलेल्या बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी केली असून नियमित तपासणी केली जात असते. तर आता सुरक्षिता म्हणून कोंबड्याचे रक्त नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तरी पोल्ट्री मालकांना जैविक सुरक्षिता उपाय योजना करण्याचा सूचना दिल्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT