Nandurbar Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar News : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढले, बँकेतून घरी परतताना काळाची झडप; भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून काढले. घराकडे येत असताना महिलेवर काळाने घाला घातला. बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला बँकेमध्ये गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. बँकेतून पैसे काढून घराकडे परत येत असताना महिलेवर काळाने घाला घातला. बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. नंदूरबारच्या नवापूरमध्ये अपघाताची ही घटना घडली. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसनीबाई गावित या महिलेने लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांच्या बँकेच्या खात्यमध्ये या योजनेचे पैसे आले होते. हेच पैसे काढण्यासाठी त्या नवापूर शहरात असलेल्या बँकेमध्ये गेल्या होत्या. बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर त्या पुन्हा घराच्या दिशेने निघाल्या होत्या. त्या नवापूरवरून वडकळंबीला दुचाकीवरून जात होत्या. यावेळी भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातामध्ये वसनीबाई गावित यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी तात्काळ नवापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गुजरातला हलवण्यात आले. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

वसनीबाई गावित यांच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. पती नसल्याने आईवरच दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी होती. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करत होत्या. सदर घटनेने वळकळंबी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर गुजरात राज्यातील व्यारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT